
Mumbai Crime News: मुंबई चालयं तरी काय? वाढत्या गुन्हेगारीला पाहून नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भररस्त्यात चालणं देखील मुश्किल झाले आहे. काही दिवसांपासून दरोड्यांची दहशत पसरली असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. दरम्यान मुलुंडमध्ये देखील एक धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. एका तरुणाला मारहाण करून त्यांच्याकडून पैसे लुटण्यात आले आहे. या घटनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणाने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिराग मकवाना असं पीडित तरुणाचे नाव आहे. तो मुलुंडमधील विना नगर परिसरातील रहिवासी आहे. गुरुवारी दुपारी तो केशव पाडा परिसरातून जात होता. त्यावेली काही टोळक्यांनी घोळका करून त्याला थांबवले. त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून मोल्यवान वस्तू आणि पैसे लुटले. त्याच्याकडून ऑनलाईन पैशांची मागणी केली. जबरदस्तीने आणि मारहाण करून त्यांच्या कडून ऑनलाईन पैसे देखील घेतले. तात्काळ दरोडे घटनास्थळावरून फरार झाले.
पीडित तरुण धावत मुंलुड पोलिस ठाण्यात गेला आणि ठाण्यात आरोपींविरुध्दात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन घेतला आणि आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तपासणी सुरु केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून शुभम परमार, जिग्नेश परमार, राहुल वाघेला आणि आकाश मोरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. यापैकी तीन आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.