राष्ट्रवादी आमदार अवधूत तटकरे यांनी मातोश्री वर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; शिवसेना प्रवेशाबद्दल राजकीय भूमिका अद्याप गुलदस्त्यात
Uddhav Thackeray and Avadhut Tatkare ( Photo credits: Twitter/ Vishwas Waghmode)

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आता सार्‍यांच राजकीय पक्षांमध्ये आयाराम- गयारामांचे प्रमाण वाढले आहे. सध्या देशभरात स्थानिक आणि राष्ट्रीय पक्षांमधूनही भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार येत आहेत. महाराष्ट्रात भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेमध्येही आता अनेकांनी पक्ष प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपा- शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यापैकी एक म्हणजे आमदार अवधूत तटकरे (Avdhut Tatkare). आज (29 ऑगस्ट) राष्ट्रवादी आमदार आणि सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवास स्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर भेट घेतली. आज त्यांच्यासोबत अनिल तटकरे देखील उपस्थित होते. नक्की वाचा:  सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत शिवसेनेत जाण्याची शक्यता

अवधूत तटकरे यांनी अद्याप राष्ट्रवादीला सोडून भाजपा- शिवसेना युतीमध्ये प्रवेश करण्याबाबत कोणताच थेट खुलासा केलेला नाही. मात्र येत्या दोन दिवसात अवधूत तटकरे आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर या तारखा जाहीर केल्या जातील अशी चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना - भाजपामधील इनकमिंग वाढले आहे.

मागील काही दिवसांपासून अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र शिवसेनेत सुनिल तटकरेंनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. दरम्यान मागील काही दिवसांतच निर्मला गावित, रश्मी बागल, दिलीप सोपल यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधून मोठे नेते बाहेर पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.