मुंबई: NCP नेत्या विद्या चव्हाण आणि कुटुंबियांच्या विरोधात विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल; सुनेचा छळ केल्याचा आरोप
Vidya Chavan | Photo Credits: Facebook

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विलेपार्ले येथे पोलिस स्थानकामध्ये सुनेचा छळ केल्याप्रकरणी त्यांचे पती अभिजित चव्हाण, दोन्ही मुलं आणि सुनेच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान या पोलिस तक्रारीमुळे विद्या चव्हाण यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ही तक्रार जानेवारी 2020 मध्ये नोंदवण्यात आली आहे. ANI ट्वीटनुसार, विद्या चव्हाण यांच्या विरोधात कलम 498A, 354, 323, 504, 506 and 34 IPC अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडिता ही अजित चव्हाण यांची पत्नी आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार विद्या चव्हाण यांच्यावर नातवाच्या हट्टापायी सुनेचा छळ करण्यात आला आहे. दोन्ही वेळीस मुलगी झाल्याने चव्हाण कुटुंबीयांनी आपला छळ केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांच्या सुनेने केला आहे. विलेपार्ले पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवल्यानंतर चव्हाण कुटुंबीयांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. तर विद्या चव्हाण यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. गोरखपूर येथे हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळले, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद (Video)

ANI Tweet

दरम्यान PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना विद्या चव्हाण यांनी  आपल्या सुनेचे  अनेक विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला आहे. तर पीडेतेने दीर आनंद आणि जाऊ शीतल आपल्याशी गैरवर्तन करत मानसिक त्रासही देत असल्याचा आरोप लावला आहे. दरम्यान पीडितेने दुसरीदेखील मुलगी झाली आणि तिचे अकाली निधन झाले त्यावेळेस पोलिसांकडे धाव घेतली.  दरम्यान पीडितेने आपल्या काही मौल्यवान वस्तू चव्हाण कुटुंबीयांकडे असून त्याची वारंवार मागणी करूनदेखील त्या परत मिळत नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकारानंतर चव्हाण कुटुंबीयांकडून पीडित आणि तिच्या पतीला संमतीने वेगळे होण्याचा पर्यायदेखील सुचवला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये विद्या चव्हाण या राष्ट्रवादी पक्षाकडून दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या मात्र त्यांना या निवडणूकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.