मुंबईतील (Mumbai) नायर रुग्णालयात (Nair Hospital) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांच्या वॉर्ड मध्ये उपचार करत असताना एका डॉक्टराच्या डोक्यावर सिलिंग फॅन कोसळल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मंगळवारी, 19 मे रोजी संध्याकाळी ही घटना घडली. ANI च्या माहितीनुसार, या घटनेत 26 वर्षीय निवासी डॉक्टरला डोक्याला दुखापत झाली. डॉक्टरांना तातडीने रुग्णालयाच्या आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचारासाठी नेण्यात आले. या डॉक्टरांची स्थिती सध्या स्थिर आहे. त्याचा सीटी स्कॅन निकाल सुद्धा सामान्य आला सून रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी यांनी डॉक्टरला किरकोळ दुखापत झाली आहे मात्र तो पूर्णपणे ठीक आहे अशी माहिती दिली. या घटनेनंतर प्रशासनाने डॉक्टर व रूग्णांची सुरक्षा सुनिश्चित करावी लागेल. अशा घटना अस्वीकार्य आहेत, ”अशी प्रतिक्रिया अन्य निवासी डॉक्टरांनी नोंदवली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडून असलेले नायर रुग्णालय, मागील महिन्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी राखीव करण्यात आले होते. यावेळी कोरोना नसलेल्या सर्व रूग्णांना बाहेर हलविण्यात आले. गेल्या आठवड्यात, बीएमसी संचालित बीवायएल नायर आणि कस्तुरबा रुग्णालयांना प्लाझ्मा चाचणीसाठी सुद्धा परवानगी मिळाली होती.
ANI ट्विट
Maharashtra: A 26-year-old resident doctor working in a COVID19 ward at Mumbai's Nair hospital sustained head injury after a ceiling fan fell on him yesterday. He is currently kept under observation at the hospital.
— ANI (@ANI) May 20, 2020
दरम्यान, मुंबई मध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मध्ये सद्य घडीला कोरोनाचे 22 हजार 563 रुग्ण असून यापैंकी 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नायर, कस्तुरबा, सहित अनेक सरकारी रुग्णलयात या रुग्णानावर उपचार सुरु आहेत.