Representational Image (Photo Credits: PTI)

विदर्भातील (Vidarbha) चाकरमान्यांसह मुंबईत (Mumbai) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), चंद्रपूर (Chandrapur), यवतमाळ (Yavatmal), अमरावती (Amravati) या भागातून मोठ्या संख्येन चाकरमानी मुंबईत (Mumbai) कामासाठी येतात पण सणासुदीच्या दरम्यान घरी जातात. तरी मुंबईतून विदर्भात जाणाऱ्या अगदीच बोटावर मोजता येईल एवढ्याच रेल्वेचे पर्याय आहे. एरवीचं घरी जायचं असल्यास महिन्यां आधिपासून तिकिट बूक (Ticket Booking) करावं लागतं. त्यात आता सणासूदीच्या दिवसांत तिकीट (Ticket) मिळण अशक्यचं. त्यात नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai) अंतर अधिक असल्याने  रेल्वे हा सगळ्यात सोयिस्कर आणि किफायती मार्ग आहे. म्हणून जास्तीत जास्त विदर्भकर रेल्वे मार्गाला पसंती दाखवतात.

 

तरी यासर्व बाबी लक्षात घेता मध्य रेल्वे (Central Railway) कडून मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस (Mumbai Nagpur Weekly Superfast Express) सुरु करण्यात आली आहे. नव्याने सुरु करण्यात आलेली ही ट्रेन (Train) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून 22 ऑक्टोबरला आणि 29 ऑक्टोबर 2022 रोजी 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी साडे तीन वाजता नागपूरला पोहोचेल. नव्याने सुरु करण्यात आलेल्या या ट्रेनचा क्रमांक 01033 असा आहे. तसेच 01034 विशेष नागपूर-मुंबई ट्रेन साप्ताहिक सुपरफास्ट विशेषत: 23 आणि 30 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूरवरुन दुपारी दीड वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. (हे ही वाचा:- Mumbai Weather Updates: मुंबईत आज ढगाळ हवामानाचा अंदाज; पहा भरती, ओहोटीच्या वेळा)

 

तरी या फेस्टीव्हल ट्रेनबाबत (Festival Train) सविस्तर माहिती हवी असल्यास https://www.irctc.co.in/nget/  या भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) अधिकृत वेबसाईटला (Website) भेट देत तुम्ही जाणून घेवू शकता. तसेच या फेस्टीव्हल रेल्वेच्या तिकीट बूकींला (Festival Railway Ticket Booking) सुरुवात झाली असुन तुम्ही ऑनलाईन (Online) किंवा थेट रेल्वे स्थाकावर जावून ही तिकीट बुक करु शकता