Online Education: आईने मुलीला पेन्सिलनं भोसकलं; ऑनलाईन वर्गावेळी मुंबईतील घटना
pencil | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

ऑनलाईन शिकवणीचे (Online Education) वर्ग सुरु असताना शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न आल्याने चिडलेल्या आईने आपल्या मुलीला पेन्सिलनं भोसकलं आहे. ही घटना मुंबई (Mumbai ) येथे घडली. चिडलेल्या आईचे एकवेळ भेसकून समाधान झाले नाही. तिने मुलीवर पेन्सीलने वार केले आणि तिला जखमी केले. दरम्यान, आई असलेल्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जखमी विद्यार्थीनीह ही इयत्ता सहावीत शिकत आहे. घडलेला प्रकार तिच्या मोठ्या बहिनीने पाहिला. तिने चाईल्ड हेल्पलाईनला (Child Helpline) फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार पुढे आला.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना बुधवारी (14 ऑक्टोबर) घडली. कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार सध्या शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळांनी ऑनालाईन शिक्षण वर्गाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण घेता येत आहे. पीडित विद्यार्थीनीही अशाच प्रकारे ऑनलाईन वर्गाला बसली होती. दरम्यान, शिक्षकांनी तिला एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थीनीला आले नाही. त्यामुळे तिची आई प्रचंड चिडली आणि तिने विद्यार्थीनीला भोसकले. (हेही वाचा, Online Classes From Tree Top: नंदुरबारच्या शिक्षकाची चिकाटी; जमिनीवर मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने चक्क झाडावर चढून मुलांना शिक्षण (See Photo))

आईने केलेले कृत्य पीडित विद्यार्थीनीच्या मोठ्या बहिनीने पाहिला. तिने फोन करुन चाईल्ड हेल्पलाईनला घटनेबाबत माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईनचे दोन कार्यकर्ते प्राप्त माहितीनुसार पीडित मुलीच्या घरी पोहोचले. या कार्यकर्त्यांनी घडलेल्या घटनेबाबत नेमकी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, पीडितेच्या आईने काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे संबंधित घटनेबाबत सांताक्रूझ पोलीस ठाणे दप्तरी आई असलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी महिलेला अद्याप अटक करण्यात आली नाही.