Mumbai Traffic Update: जून महिना सरला तरीही मुंबईत पावसाचं आगमन झालं नव्हतं. अखेर आज सकाळपासून मुंबईत दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई सह उपनगरामध्ये पावसाला सुरूवात झाल्याने मुंबईत वाहतूक मंदावली आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर वाहतूक मंदावली आहे. रस्त्यांवरही वाहनांची रांग बघायला मिळत आहे. Maharashtra Monsoon 2019 Live Updates: साचलेल्या पाण्याचा संध्याकाळपर्यंत निचरा होईल, मुंबई महानगरपालिकेचे आशादायी ट्विट
ट्रेन वाहतूक
मध्य रेल्वेवर आसनगाव - वाशिंद दरम्यान इंजिनात बिघाड झाल्याने कसाराकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वे रखडत सुरू असल्याने प्रवाशांना किमान 15-20 मिनिटं ट्रेन्सची वाट पहावी लागत आहे.
रस्ते वाहतूक
मुंबईत हिंदमात, किंग्ज सर्कल सारख्या सखल भागात पाणी साचल्याने अनेकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पश्चिम द्रुतगती, पूर्वे द्रुतगती मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई महानगर पालिकेने सखल बहगात साचलेलं पाणी मोकळं होण्यास काही वेळ लागेल मात्र संध्याकाळपर्यंत सारं सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटल आहे.
Hello, Mumbai! The island city and suburbs have received 33 mm and 95 mm rainfall respectively. While we're on our toes, it may take some time to pump out all water from waterlogged areas owing to neap tide. Hopefully, all should be well by late evening. #MumbaiRains pic.twitter.com/U4W8I290gz
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 28, 2019
विमान वाहतूक
मुंबई विमानतळावर धूरकट वातावरण असल्याने विमानांची वाहतूकदेखील काही काळ उशिरा आहे.
मुंबईमध्ये पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे.