बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या जुहू येथील 'प्रतिक्षा' बंगल्याबाहेर मनसे कडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान संत ज्ञानेश्वर मार्ग रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन देण्याच्या या प्रकरणी ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. काल (14 जुलै) हे पोस्टर लावण्यात आले असून पोस्टर वर मनसेचे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांचा उल्लेख आहे.
2017 साली मुंबई केने जुहूच्या संत ज्ञानेश्वर मार्ग परिसरात आजू बाजूच्या सर्व इमारती आणि बंगल्यांच्या मालकांना त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी नोटीस दिली होती. बहुतांश भूखंड मालकांनी प्रतिसाद दिला आहे मात्र अमिताभ बच्चन यांनी यावर कोणतेही उत्तर मुंबई महानगरपालिकेला दिले नसल्याचं सांगत मनसेने एका पोस्टर द्वारा बिग बींना पुन्हा त्याची आठवण करून दिली आहे. दरम्यान बिग “बी” आपला “बिग” हार्ट दाखवा, मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच “प्रतीक्षा”असा मजकूर पोस्टर वर लिहण्यात आला आहे. (नक्की वाचा: Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप; एका महिलेच्या फेसबूक पोस्टनंतर चर्चांना उधाण).
बीएमसी कडून 2019 मध्ये प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतीची भिंत पाडली आहे पण अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर अजूनही कारवाई केलेली नाही. संत ज्ञानेश्वर मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा आहे. या वाहतूक कोंडीमध्ये सुटका मिळवण्यासाठी आता रस्ता रूंदीकरणाचा पर्याय पुढे येत आहे. जर या रस्त्याचे रुंदीकरण झाले तर परिसराती वाहतूक कोंडी आणि लोकांचा त्रास देखील कमी होईल असा पालिकेला विश्वास आहे. पालिकेला बिग बिंच्या बंगल्याची भिंत तोडून रस्ता 60 फीट लांब करायचा आहे. सध्या या रोडची लांबी 45 फीट आहे.