मुंबई: कोविड-19 लॉकडाऊनमध्ये मालाड येथील दाम्पत्याने PF मोडून केले अन्नवाटप; आतापर्यंत तब्बल 4.5 लाख खर्च
Migza & Faiz, a couple distributed food during lockdown (Photo Credits: ANI)

देशावर ओढावलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) जागतिक आरोग्य संकटाचा परिणाम आर्थिक व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणावर झाला. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) जवळपास सर्वच व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झाले. अनेकजण बेरोजगार झाले तर काहींना पगार कपातीला समोरे जावे लागले. त्यामुळे अनेकांना संसाराची आर्थिक घडी सांभाळणे काहीसे कठीण होत आहे. यातच मुंबई (Mumbai) मधील मालाड (Malad) येथील एका दाम्पत्याने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मिग्झा (Migza) आणि फैज (Faiz) या दाम्पत्याची मालाड येथे शाळा आहे. लॉकडाऊन दरम्यान त्यांनी मुलांची शाळेची फी माफी केली. तसंच लोकांमध्ये अन्नाचे वाटप केले.

या संदर्भात सांगताना फैज यांनी सांगितले की, "मी देखील एका कंपनीसाठी काम करतो. त्यामुळे अन्नदान करणे शक्य झाले. पण जेव्हा गरजूंची संख्या वाढली तेव्हा मी माझ्या पीएफ मधील बचत वापरण्याचे ठरवले. आतापर्यंत यासाठी मी 4.5 लाख रुपये खर्च केले आहेत." यातून या दाम्पत्याची मदत करण्याची वृत्ती दिसून येते. (Lockdown: मुंबई शहरात लॉकडाऊन काळात अडलेल्यांसाठी महिला रिक्षाचालक शितल सरोदे यांची मोलाची मदत)

ANI Tweet:

फैज यांचे हे पाऊल अत्यंत स्त्युत्य असून त्यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसतो. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी अन्नदान करुन गरजूंचे पोट भरले आहे. तर अनेकांनी विविध माध्यमातून मदत करत लॉकडाऊनचा काळ सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान मुंबईत सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आलं आहे. तसंच अनलॉकच्या माध्यमातून जनजीवनाची गाडी रुळावर येत आहे.