MHADA Mumbai | File Image

Mumbai MHADA Lottery 2024 Result Today: म्हाडा मुंबई विभागाकडून (Mumbai MHADA) जाहीर केलेल्या 2030 घरांसाठीच्या सोडतींचा आज निकाल जाहीर केला जाणार आहे. 2030 घरांसाठी 1 लाखापेक्षा अधिक लोकांचे अर्ज म्हाडाकडे आले आहेत.आता यामधून भाग्यवान विजेत्यांची नावं जाहीर केली जाणार आहेत.मुंबई मध्ये नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात अर्जदार निकाल पाहू शकतात पण हा निकाल घरबसल्या पहायचा असेल @mhadaofficial या युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवर येथे सकाळी 11 वाजता सोडतीचा निकाल जाहीर करण्यास सुरूवात होणार आहे तर संध्याकाळी प्रतिक्षा यादी आणि विजेत्यांची यादी housing.mhada.gov.in वर अपडेट केली जाणार आहे.

मुंबई मध्ये गोरेगाव, मालाड, जुहू, दादार, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवार नगर, पवई या भागातील ही म्हाडाची घरं आहेत. या निकालाच्या सोडतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. पात्र उमेदवारांमधून मुंबई मध्ये विविध उत्पन्न गटामधून नागरिकांना घरं मिळणार आहेत. या सोडतीसाठी काही घरांच्या किंमती म्हाडाने जाहिरात आल्यानंतर घट केली होती.

म्हाडा मुंबई घरांसाठी आज लाईव्ह निकाल कुठे पहाल?

मुंबई म्हाडाच्या घरांसाठी आज सकाळी 11 पासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात अर्जदार निकाल पाहू शकतात पण हा निकाल घरबसल्या पहायचा असेल @mhadaofficial या म्हाडाच्या अधिकृत युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवर पाहता येणार आहे.

म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वर विजेत्यांची यादी

सकाळी 10.30 वाजल्यापासून निकाल सुरू होईल. टप्प्याटप्प्याने तो जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी सहा नंतर housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईट वर निकाल सविस्तर अपलोड केला जाईल. यामध्ये विजेत्यांच्या यादी सोबत प्रतिक्षेमध्ये असलेल्या उमेदवारांची देखील यादी जारी होणार आहे.

मुंबई म्हाडा मंडळाने यावर्षी 359 घरे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी (EWS), 627 कमी उत्पन्न गटासाठी (LIG), 768 मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG), आणि 276 उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) आरक्षित ठेवली आहेत. तर घरांच्या किंमती  29 लाख ते 6.82 कोटी दरम्यान आहे.