Mumbai  Metro 18 ऑक्टोबर पासुन फेर्‍यांमध्ये वाढ करणार; पहिली ट्रेन सकाळी 6.30 वाजता धावणार
मेट्रो सेवा (फोटो सौजन्य-Facebook)

मुंबई मध्ये कोरोनाचा विळखा कमी झाल्याने आता नागरिकांची, कामावर जाणार्‍यांची वर्दळ वाढली आहे. परिणामी वाढते प्रवासी पाहता आता मुंबई मेट्रो (Mumbai Metro) कडून त्यांच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. सोमवार, 18 ऑक्टोबर पासून सकाळी घाटकोपर स्थानकातून (Ghatkopar Metro Station) पहिली मेट्रो 6.30 वाजता सुटणार आहे. तर वर्सोवा (Versova Metro Station )वरून देखील घाटकोपरसाठी पहिली मेट्रो 6.30 वाजता सुटेल.

मुंबई मेट्रो ही घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान नियमित चालवली जाते. यामध्ये आतापर्यंत घाटकोपर वरून पहिली मेट्रो 7.15 वाजता सोडली जात होती तर स्थानकं त्यापूर्वी 15 मिनिटं खुली केली जात होती पण आता 6.30 ला घाटकोपर- वर्सोवा मेट्रो धावेल तर शेवटची मेट्रो घाटकोपर ते वर्सोवा रात्री 10.55 ची असणार आहे. पूर्वी शेवटची मेट्रो 10.15 ची होती. वर्सोवा वरून देखील पहिली मेट्रो 6.30 ची असणार आहे तर शेवटची 10.30 ची रात्री असणार आहे.

Mumbai Metro Tweet 

मेट्रोच्या माहितीनुसार, सोशल डिस्ट्न्सिंग पाळता यावं म्हणून ऑपारेटिंग तासांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या वेळापत्रकात पिक आव्हर्स मध्ये ट्रेन ची फ्रिक्वंसी 4.5 मिनिटांची असणार आहे तर नॉन पिक अव्हर्स मध्ये ती 10 मिनिटांची असणार आहे. नक्की वाचा: Mumbai Metro ची रेड लाईन 7, यलो लाईन 2A येत्या 3-4 महिन्यात सुरू होण्याची शक्यता; MMRDA ची माहिती.

कोरोना जागतिक महामारीच्या पूर्वी वीक डेज मध्ये घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान 400 ट्रेन फेर्‍‍या चालवल्या जात होत्या. मात्र नंतर कोविड नियमावलीचं पालन करत हळूहळू फेर्‍या वाढवल्या जात आहेत. दरम्यान मुंबई लोकल प्रमाणे मेट्रो प्रवासादरम्यान कोविड 19 लस बंधनकारक नाही.