metro | Twitter

मुंबई मेट्रो वन (Mumbai Metro One) (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) मार्गावर धावणार्‍या मेट्रोच्या प्रवाशांना आता तिकीटासाठी एक अनोखी पद्धत आणण्यात आली आहे. ज्यामध्ये wearable wristband चा समावेश आहे. हा टॅपटॅप म्हणून ओळखला जातो. मेट्रो प्रवासात त्याच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट लेस पद्धतीतून तिकीट काढता येणार आहे. TOI च्या रिपोर्टनुसार, मेट्रो वन चा हा बॅन्ड पर्यावरण पुरक पदार्थांपासून बनवला आहे. त्वचेवर नॉन अ‍ॅलर्जिक आणि त्रास न देणारा आहे. मेट्रो ने हा बॅन्ड 200 रूपयांच्या ऑफर प्राईज मध्ये आणला आहे. AFC गेट वर हा बॅन्ड फक्त टॅप करावा लागणार आहे.

बँड मुंबई मेट्रो वन स्थानकांवरील customer care centers वर उपलब्ध आहेत. हे उत्पादन मुंबई मेट्रो वनने बिलबॉक्स प्युअररिस्ट टेक सोल्युशन्ससह विकसित केले आहे.

सध्या वापरात असलेल्या स्टोअर व्हॅल्यू पासप्रमाणेच प्रवासी त्यांचे टॅपटॅप रिस्टबँड खरेदी आणि रिचार्ज करू शकतात. पारंपारिक पेमेंट पद्धतींच्या तुलनेत कमी झालेल्या कार्बन फूटप्रिंटवर जोर देऊन MMOPL अधिकाऱ्याने TapTap चे पर्यावरणीय फायदे हायलाइट केले. रिस्टबँड बॅटरीशिवाय चालतो, वॉटरप्रूफ आहे आणि सहज वापरता येतो.

मुंबई मेट्रो वनने टॅपटॅपच्या सादरीकरणासोबतच परतीच्या प्रवासाची तिकिटे, मासिक अमर्यादित प्रवास पास आणि व्हॉट्सॲप ई-तिकीटिंग समाविष्ट करण्यासाठी तिकीट पर्यायांचा विस्तार केला आहे.