लोकलसेवेवरील भार कमी करणारी मुंबई मेट्रो (Mumbai Metro) प्रवाशांसाठी एक खास सुविधा प्रदान करत आहे. 1 फेब्रुवारीपासून मेट्रो-1 कंपनीने घाटकोपर वर्सोवा मेट्रो प्रवाशांसाठी कॅशबॅक सेवा सुरु केली आहे. या कॅशबॅक योजनेचा लाभ स्टोअर व्हॅल्यू पासधारकांना होणार आहे.
मेट्रोचे सध्याचे भाडे 10 ते 40 रुपयांपर्यंत आहे. तर तीन पद्धतीने तिकीट यंत्रणा काम करते. 1. स्टोअर व्हॅल्यू पास 2. परतीच्या प्रवासाचे टोकन 3. मासिक पास. यापैकी सर्वाधिक प्रवासी 'स्टोअर व्हॅल्यू पास'चा वापर करतात. या पासचा वापर करणाऱ्यांची संख्या वर्षभरात 50% वाढली आहे.
ही बाब लक्षात घेत मेट्रोने कॅशबॅक ऑफर सुरु केली आहे. त्यामुळे पासवर मिळाणारे लाभ अधिक वाढणार आहेत. तसंच स्टोअर व्हॅल्यू पासचा वापर अधिकाधिक लोकांनी करावा, त्यावर जास्त रक्कमेचे रिचार्ज करता यावे, यासाठी ही कॅशबॅक योजना आखण्यात आली आहे. तसंच यामुळे तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. (मुंबई परिसरातील तीन नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा)
काय आहे ही कॅशबॅक सेवा?
# 200 ते 600 रुपयांच्या रिचार्जवर 2 ते 10% कॅशबॅक मिळेल.
# आतापर्यंत प्रवाशांना त्यांनी केलेल्या प्रवासावर 5 रुपयांचा लाभ मिळत होता. आता रिचार्जवर कॅशबॅक मिळेल.
# कमी अंतराच्या प्रवाशांनाही या सेवेअंतर्गत लाभ मिळेल. यापूर्वी तो मिळत नव्हता.
कॅशबॅक मिळालेली रक्कम प्रवास करतानाच समजेल.
# ट्रॅव्हल बॅलन्स इतकाच कॅशबॅक असेल. त्याचा तुम्ही प्रवासासाठी वापर करु शकता.
# कॅशबॅकची व्हॅलिडीटी दीर्घकाळ असेल. सहा महिन्यांनंतर पास रिन्यूव्ह करावा लागेल.
# 31 जानेवारी, 2019 पर्यंत शिल्लक असलेल्या रक्कमेवर 10% कॅशबॅक मिळेल.
मेट्रोच्या या नव्या सेवेमुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होईल.