मुंबई कार शेड आरे जंगलातून कांजूर मार्ग येथे हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता इतर ठिकाणांची चाचपणी सुरू आहे. यामध्ये बीकेसीचं नाव देखील आघाडीवर आहे. पण अशाप्रकारे मुंबई मेट्रो साठी सरकारने बीकेसीच्या नावाचा विचार सुरू असल्याचं म्हणणं म्हणजे पोरखेळ सुरू असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधीनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान मेट्रो कार शेड बीकेसीमध्ये हलवणं हा प्रकार मोठा खर्चिक असल्याचंही नमूद केलं आहे. Kanjurmarg Metro Car Shed स्थगितीबाबत कोर्टाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया.
मुंबई मध्ये मेट्रो कार शेड बुलेट ट्रेन प्रमाणे बीकेसीमध्ये आणल्यास त्याच्या जमीन खरेदीपासून वार्षिक देखभालीचा खर्च 5 ते 6 पट वाढू शकतो. सध्या 500 कोटीमध्ये होणारा मुंबई मेट्रो कार शेडचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 5 हजार कोटींचा भुर्दंड पडू शकतो. बीकेसीत जमीन खरेदीसाठी देखील मोठी रक्कम मोजावी लागेल असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे जर सरकारला कोणी अशाप्रकारे खरंच मेट्रो कार शेडसाठी बीकेसीच्या नावाचा सल्ला देत असेल तर त्यामुळे महाराष्ट्र सरकार तर बुडलेच पण त्यासोबतच राज्य देखील बुडेल असं भाकित त्यांनी मांडलं आहे. हा विचार हास्यास्पद आणि पोरखेळ चालू आहे.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
बीकेसीमध्ये कारशेडचा सल्ला हा निव्वळ पोरखेळ!
ही आहेत कारणे...#MumbaiMetro pic.twitter.com/lxx8tzeXzd
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 18, 2020
दरम्यान फडणवीस सरकारच्या काळात मुंबई मेट्रो प्रोजेक्टसाठी आरे मध्ये जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र त्याला पर्यावरणवादी संघटना, शिवसेना, मनसेने विरोध दर्शवला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येताच त्यांनी आरे मधून मुंबई मेट्रो कार शेड कांजुरमध्ये हलवण्याचा निर्णय जाहीर केला पण ती जागा मिठागर आणि केंद्र सरकारच्या मालकीची असल्याचा दावा करत त्यांनी कोर्टानेही सरकारला काम जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.