Mumbai Megablock Update 25th August: आज मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Megablock (Photo Credits:Twitter)

दर रविवार प्रमाणे आज ,25 ऑगस्ट रोजी मुंबई लोकलच्या मध्य(Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गांवर विविध तांत्रिक कामानिमित्त मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द राहतील तर अन्य ठिकाणी लोकलचा उशिराने धावणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, आज मध्य रेल्वे  मुख्य मार्गावर कल्याण (Kalyan) ते ठाणे (Thane) हार्बर मार्गावर वाशी (Vashi) ते कुर्ला (kurla) दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ट्रेन हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वे वर बोरिवली (Borivali) ते भाईंदर (Bhayander) दरम्यान ब्लॉक घेणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. परिणामी ब्लॉकच्या अवधीत लोकलच्या फेऱ्या 15 ते 20 मिनिटे उशिराने असणार आहेत.

मेगाब्लॉक वेळापत्रक

मध्य रेल्वे 

कल्याण ते ठाणे स्थानकांच्या दरम्यान अप जलद मार्गावर उद्या सकाळी 10.54 पासून दुपारी 3.52 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. यामुळे ब्लॉककाळात अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच ठाणे स्थानकाच्या पुढे लोकल पुन्हा जलद मार्गावरून धावतील. यामुळे लोकल 20 मिनिटे आणि एक्स्प्रेस 30 मिनिटे उशिराने अपेक्षित आहेत.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे वर उद्या वाशी ते कुर्ला येथील अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 दरम्यान घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सीएसएमटी - पनवेल/वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. तसेच हार्बर प्रवाशांना त्याच तिकीट, पासवर सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची सुट असणार आहे.

मध्य रेल्वे ट्विट

पश्चिम रेल्वे

उद्या सकाळी 11 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंतच्या वेळात बोरिवली ते भाईंदर स्थनाकांच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर पश्चिम रेल्वेच्या मेगाब्लॉक चे नियोजन करण्यात आले आहे. ब्लॉककाळात अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल बोरिवली ते वसई रोड-विरार दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल विलंबाने धावतील.