Mumbai Mega Block Updates: मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पहा या विकेंडला कसा, कुठल्या मार्गावर असेल ब्लॉक!
Railway Accident | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

विकेंडला मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करायचा म्हटला तर मेग ब्लॉक (Mega Block) चं गणित बघून बाहेर पडावं लागतं. दर शनिवार-रविवारी रेल्वेकडून ट्रॅक, सिग्नलची देखभालीची कामं केली जातात. 21-22 एप्रिलच्या विकेंडला शनिवार 21 मे दिवशी मध्यरात्री भायखळा- माटुंगा स्टेशनवर रात्रीकालीन ब्लॉक घेऊन कामं केली जाणार आहेत तर रविवारी पनवेल-वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावर वाणगाव ते डहाणू रोड मध्ये ट्राफिक ब्लॉक असणार आहे. यामुळे 14 रेल्वे सेवा रद्द केल्या जाणार आहेत तर 20 मेल एक्सप्रेस अंशतः रद्द असणार आहेत. पण प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून 5 रेल्वे गाड्यांना वाणगाव ते डहाणू रोड मध्ये अतिरिक्त थांबे दिले जाणार आहेत.नक्की वाचा: Mumbai Local Train: मुंबई लोकलमधील गारेगार प्रवास आता आणखी स्वस्त, प्रथम श्रेणी डब्याचे तिकीट दरही घटले .

मेन लाईन, हार्बर लाईन मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मेगा ब्लॉक

रद्द झालेल्या ट्रेन्स

मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन फास्ट ट्रॅकवर मार्गावरील ट्रेन अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवर वळविण्यात येणार आहेत. यामुळे लोकल 10-15 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

रविवारी हार्बर मार्गावर ब्लॉक दरम्यान पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. पनवेल-ठाणे अप-डाऊन लोकल फेऱ्या देखील रद्द असतील. खारकोपर आणि बेलापूर/नेरुळ दरम्यानच्या आणि ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल सुरू राहतील. सीएसएमटी-वाशी मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.