Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

मुंबईतील माझगाव परिसरातील एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी चार अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यास प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत कोणतीही जखमी किंवा मृत्यू झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई मिरर यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सातमजली इमारत असून दोन घरांना आग लागली आहे. ही आग दुसऱ्या टप्प्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

एप्रिल महिन्यात हॉटेल रिपन पॅलेस, बेलासिस रोड मुंबई नागपाडा येथे लागली होती. या ठिकाणी कोरोना व्हायरसच्या रुग्णांना ठेवण्यात आले होते. रिपन हॉटेलमधील लॉजिंग रुम कोरोनाबाधित रुग्णांसाठी देण्यात आली होती. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्यावेळी करण्यात आले होते.

तर मार्च महिन्यात वांद्रे मधील बँन्ड स्टँड येथील सी स्प्रिंग इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर अन्य काही जण गंभीर स्वरुपात जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते.