राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णवाढीमुळे कडक निर्बंध घालण्यात आले असून पूर्ण लॉकडाऊची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आता 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) यांच्या जयंती निमित्त दादर चैत्यभूमीवर (Dadar ChaityaBhoomi) गर्दी न करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केले आहे. कोविड-19 संकटात चैत्यभूमीवर न येता घरुनच आंबेडकरांना अभिवादन करावे. यासाठी दादर चैत्यभूमीवरील स्मारकाचे ऑनलाईन दर्शन (Online Darshan) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. येथे पाहू शकाल लाईव्ह सोहळा.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती जगभर साजरी होईल. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत असतात. परंतु, यंदा परिस्थिती वेगळी आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्वीपेक्षा अधिक वाढला असून धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकार सर्वोतोपरी उपाय करत आहे. त्यास सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा चैत्यभूमी येथे न येता कृपया आपल्या घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे मी सर्व अनुयायांना विनम्र आवाहन करते."
BMC Tweet:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमी स्मारकाचे दर्शन ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे.@mayor_mumbai श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांनी सर्व अनुयायांनी चैत्यभूमी येथे न येता घरूनच अभिवादन करावे असे विनम्र आवाहन केले आहे.https://t.co/cNT2gGpgAF
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 11, 2021
विशेष म्हणजे यावेळी दादर चैत्यभूमीवर स्मारकाचे ऑनलाईन दर्शन अनुयायांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसंच दरवर्षीप्रमाणे शासकीय मानवंदना देखील देण्यात येईल. दरम्यान, कोरोना संकटात गर्दी टाळण्यासाठी केलेल्या आवाहन नागरिक सहकार्य करतील, अशी खात्री असल्याचेही महापौर म्हणाल्या.