Jogeshwari Road Accident (Photo Credits: ANI)

मुंबई: पश्चिम द्रुतगती (Western Express Highway)  मार्गावर जोगेश्वरी (Jogeshwari)  येथे आज सकाळी ट्रक उलटून एक भीषण अपघात झाल्याचे समजत आहे. यामध्ये एकाच जागच्या जागी मृत्य झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मृत  तरुणाचे नाव बद्रू अन्सारी असे आहे, तर जावेद अन्सारी, गजेंद्र गुप्ता, दिलीप गुप्ता, राजू विश्वकर्मा हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये (Trauma Care Hospital) उपचार सुरू आहेत. तसेच कौस्तुभ पुरी यांना किरकोळ मार लागला आहे. दरम्यान रस्त्याच्या मधोमध मध्येच ट्रक उलटल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली असून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

ANI ट्विट

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, तसेच या अपघातात जखमी झालेल्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. अद्याप वाहतुकीची कोंडी सुटली नसून स्थिती पुर्वव्रत येण्यास काही वेळ लागणार आहे.