Mumbai Massive Fire At Andheri: मुंबई येथील अंधेरी परिसरात चित्रकूट मैदानावर चित्रपटाच्या सेटला आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी (व्हिडिओ)
Mumbai Massive Fire | (Photo Credit - ANI)

मुंबई (Mumbai) येथील अंधेरी (Andheri) परिसरात असलेल्या चित्रकूट मैदानावर (Chitrakoot Ground in Andheri) एका चित्रपटाच्या सेटला आग लागली आहे. आगीमध्ये सेटवरील महत्त्वाचे आणि किमती साहित्य जळून खाक झाले आहे. आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याची अद्यापतरी माहिती नाही. महापालिकेकडून क्रमांक 2 लेवलच्या आगीची सूचना अग्निशमन दलाला दिली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीची दृश्ये व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओतील दृश्य अतिशय भयावह असल्याचे पाहायला मिळते.

चित्रकूट मैदानावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असते. या मैदानावर चित्रपटाचे चित्रीकरण ही एक नियमीत बाब आहे. परिसरातील नागरिकांनाही त्याची सवय झाली आहे. चित्रिकरणादरम्यान अनेकदा कृत्रिम आग लावली जाते. तो चित्रिकरणाचा भाग असतो. त्यामुळे नागरिकही त्याकडे त्याच दृष्टीकोनातून पाहतात. मात्र, आज मैदनावर लागलेली आग कृत्रिम नव्हती. खरोखरच होती. नागरिकांना याची कल्पना यायला काहीसा अवधी लागला. सेटवरील लोकांना याची लगेचच कल्पना आली. त्यामुळे त्यांनी अग्निशमन दल आणि महापालिकेला याची माहिती दिली.

ट्विट

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, चित्रकूट मैदानावर लागलेल्या आगीपासून निवासी इमारती दूर आहेत. त्यामुळे या आगीचा धोका सध्या तरी या इमारतींना दिसत नाही. मैदानावर थर्माकॉल आणि प्लास्टीक तसेच लाकडाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आग पसरण्याच धोका आहे. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न करत आहेत.