Mumbai Marathon 2020: नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातील तिसऱ्या रविवारी होणाऱ्या 'मुंबई मॅरेथॉन' स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरुवात झाली आहे. तसेच वरळी येथून 'हाफ मॅरेथॉन'ला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय धावपटूंचा समावेश आहे. या स्पर्धेतील 3 परदेशी धावपटूंना अनुक्रमे 45 हजार डॉलर, 25 हजार डॉलर आणि 17 हजार डॉलर रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. याशिवाय भारतीय स्पर्धकांना 5 लाख, 4 लाख, 3 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. मुंबई मॅरेथॉनचे हे 17 वे पर्व आहे.
मॅरेथॉन स्पर्धा योग्यरित्या पार पडावी, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दक्षिण, मध्य आणि पश्चिम विभागातील स्थानिक पोलिस तसेच 2 हजार अतिरिक्त पोलिस, 600 वाहतूक पोलिस, 3 हजार स्वयंसेवकांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबईतील अनेक धावपटूंनीही या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यात मुंबईतील 55 हजार 322 धावपटूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या तब्बल 119 धावपटूंचा आज वाढदिवस आहे. यामध्ये 83 पुरूष तर 36 महिला धावपटूंचा समावेश आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही, बेळगाव येथे प्रकट मुलाखतीत शिवसेना नेते संजय राऊत यांचा कन्नडिगांना टोला)
सालाबादप्रमाणे याही वर्षी मुंबईत #MumbaiMarathon स्पर्धेचे आयोजन केले आहे. मा. मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्यासह यावर्षीच्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन २०२०' शर्यतीला फ्लॅग ऑफ केले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही स्पर्धकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला#TMM2020 #TataMumbaiMarathon pic.twitter.com/vWsmkxQTRM
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 19, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी वरळी येथून ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला. या मॅरेथॉनमध्ये 42.195 किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये 9660 धावपटू, 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये 15 हजार 260 धावपटू, 10 किमीच्या स्पर्धेत 8,032 हजार धावपटू, वरिष्ठांच्या शर्यतीमध्ये 1 हजार 22 आणि अपंगांच्या स्पर्धेत 1 हजार 596 धावपटू सहभागी होणार आहेत.