मुंबईतील मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन एका तरुणीने उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे मंत्रालयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलीचा जीव मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीमुळे वाचला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंत्रालयात दुपारच्या सुमारास हा प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे. सदर तरुणी काही कामासाठी मंत्रालयात आली होती. मात्र थोड्यावेळानंतर तिने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. प्रथम हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. पण ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत संरक्षक जाळीवर पडलेल्या तरुणीला बाहेर काढण्यात आले. तसेच तरुणी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे समोर आल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी तिला वाचवण्याऐवजी तिचे फोटो आणि व्हिडिओ काढल. परंतु तरुणीने आत्महत्येचा का प्रयत्न केला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.(बेरोजगार तरुणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न)