मानखूर्द येथील एका गोदामाला लागलेली भीषण आग (Mankhurd Fire) आसपास पसरली आणि या आगीने रौद्र रुप धारण केले. मानखुर्द येथील मंडला (Mandla Area of Mankhurd)) परिसरात आज (शुक्रवार, 5 फेब्रुवारी) दुपारी साधारण तीन वाजणेच्या सुमारास लागलेली आग (Fire At Mandla Area of Mankhurd) आता तब्बल 7 तास उलटून गेले तरी धुमसतीच आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 14 ते 15 गाड्या आणि जवान ही आग (Fire At Mankhurd) आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापही या प्रयत्नांना यश आले नाही.
प्राप्त माहितीनुसार मानखूर्द येथील एका भंगार (स्रॅप) गोदामाला ही आग लागली. या परिसरात आणखीही काही गोदामे, छोटे मोठे कारखाने, आणि झोपडपट्टी असा दाटीवाटीचा परिसर आहे. त्यामुळे ही आग आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणावर पसरली. परिसरातील अनेक गोदांमध्ये ऑईलचा साठा (ब्लॅक ऑईल) असल्याने ही आग आणखीणच पसरल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. परंतू, वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आगीचे प्रत्यक्षदर्शी सांगतात की आग लागल्याच्या परिसरात आणखीही काही भंगाराची, प्लॅस्टीकची गोदामे आहेत. त्यामुळे ही आग आणखी भडकू शकते.
सुरक्षेचा आणि आग आटोक्यात आण्याचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीचा परिसर मोठ्या प्रमाणावर खाली केला आहे. दाट लोकवस्तीचे ठिकाण असल्याने या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. (हेही वाचा, Mankhurd Fire: मुंबईतील मानखूर्द येथे मंडला परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 15 ते 16 जागा घटनास्थळी)
आग अद्यापही आटोक्यात आली नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुर असतानाच राजकीय पक्षांनी मात्र आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका आणि दलाल यांच्यात मिलीभगत आहे. त्यामळे असे प्रकार घडतात. हे दलाल बाहेर निघाल्याशिवाय अशा गोष्टी घडण्याचे प्रमाण कमी येणार नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी या परिसरात वेकायदेशिररित्या लोखंड तयार करणयाचे तसेच, नकली साबन आणि इतर वस्तू तयार करण्याचे कारखाने आहेत, अशी तक्रार आपण कलेक्टरकडे केली होती. याशिवाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही आपण या परिसरात पर्यावरणविरोधी गोष्टी घडत असल्याची तक्रार दिली होती. परंतू, त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. आता या ठिकाणी आग लागल्याचे आजमी यांनी म्हटले.