Mankhurd Fire |

मुंबईतील (Navi Mumbai) मानखूर्द (Mankhurd) येथील मंडला ( Mandla) परिसरात भीषण आग ( Fire At Mandla Area of ​​Mankhurd) लागली आहे. आगीचे लोठ आकाशात उंचच उंच उडताना दिसत आहेत. आग आठोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 ते 16 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग इतकी प्रचंड आहे की, आगीचे लोट आकाशात पसरताना तीन ते चार किलोमिटर अंतरावरुन दिसत आहेत. आगिचे कारण अद्याप पुढे आले नाही.

प्राप्त माहितीनुसार, आग लागलेला परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा आहे. याच परिसरात लाकडाच्या मोठ्या वखारी आहेत. तसेच, या ठिकाणी ऑईल गोडाऊनही असल्याचे सांगितले जात आहे. ऑईल गोडावून असल्यामुळे ही आग पसरत असल्याचे सांगितले जात आहे. आगीचे मोठमोठे स्फोटही ऐकू येत आहेत.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यासोबतच परिसरातून नागरिकांना इतर ठिकाणी हालवले जात आहे. या ठिकाणी झोपडपट्टीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हा परिसर अत्यंत दाठीवाठीचा आहे. एकूण परिस्थीती पाहता आग आठोक्यात आणण्यात मोठे अडथळे येत आहेत. परिणामी अग्निशमन दलाला आग आठोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.