Ex-Navy officer Madan Sharma Maharashtra Governor Meeting: माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट; राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी
Madan Sharma, ex-Navy officer | Photo Credits: Twitter

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कार्टुन शेअर केल्याने काही शिव सैनिकांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा (Ex-Navy officer Madan Sharma) यांना मारहाण केली. आता या प्रकरणावरून राजकारण तापत असताना आज मदन शर्मा  राजभवनावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या भेटीला पोहचले. दरम्यान या भेटीनंतर बाहेर पडल्यावर कोश्यारी यांच्याकडे राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी केल्याचं मदन शर्मा यांनी सांगितलं आहे. तसेच आरोपींवर लावण्यात आलेले गुन्हे देखील कमी सौम्यतेचे आहेत. ही बाब राष्ट्रपतींच्या कानावर घातली आहे.

राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी आणि मदन शर्मा यांच्यामध्ये झालेल्या बातचितीनंतर या प्रकरणी राज्यपाल केंद्राशी बोलणार असल्याचं देखील त्यांनी सांगितल्याची माहिती दिली आहे. यासोबतच शिवसैनिकांनी जेव्हा मारहाण केली तेव्हा त्यांनी माझे संबंध भाजपा आणि आरएसएस सोबत जोडले होते. मात्र आता मीच सांगतो की मी आता भारतीय जनता पक्ष आणि आरएसएससोबत आहे.

ANI Tweet

काल मदन शर्मा यांना मारहाण प्रकरणी जामीनावर सुटलेल्या 6 आरोपींना पुन्हा अटक झाली आहे. समता नगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये कलम 452 वाढवण्यात आले आहे.आज या आरोपींना कोर्टात दाखल केले. 6 आरोपींना बोरिवली कोर्टाने  आज  न्यायालयीन कोठडी  ठोठावली आहे.

मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांकडून मारहाण केल्यानंतर त्याचे पडसाद दिल्लीपर्यंत पोहचले होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेत निषेध नोंदवला होता. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या शहरात अशा गोष्टी होता. इतरत्र होनार्‍या सैन्य दलातील अधिकार्‍यांवरील हल्ल्यांची किती दखल घेतलि जाते? असं विचारत ही शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया होती असं म्हटलं होतं.