
मुंबई (Mumbai) मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway) आज रात्री 10 वाजल्यापासून 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 1 मार्च रात्री 10 वाजल्यापासून 2 मार्च सकाळी 11 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. मुंबई सेंट्रल ते ग्रॅन्ट रोड (Mumbai Central-Grant Road Stations) दरम्यान ब्रिटीशकालीन पुलाच्या री गर्डरिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. अशाप्रकारे हा दुसरा ब्लॉक घेण्यात आला आहे. मागील महिन्यातही अशाच प्रकारे ब्लॉक घेण्यात आला होता. गर्डरच्या कामादरम्यान अप आणि डाऊन फास्ट लाईन वरील ट्रेन्स चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ट्रेन धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल फेर्या रद्द केल्या जाऊ शकतात तर काहींना शॉर्ट टर्मिनेट करून वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंत चालवले जाऊ शकते.
पश्चिम रेल्वे कडून शनिवारी रात्री 26 गाड्या रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. तर रविवारी 142 गाड्या रद्द आहेत. तर दादर स्थानकामध्ये 26 ट्रेन्स शॉर्ट टर्मिनेट आणि 72 गाड्या वांद्रे स्थानकामध्ये शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. तर या वेळेत 15-30 मिनिटं गाड्या उशिराने धावतील अशीही माहिती देण्यात आली आहे.
ग्रॅंट रोड- मुंबई सेंट्रल नाईट ब्लॉक
2 मार्चचा ब्लॉक
सुमारे शतकापूर्वीच्या या ब्रिटीशकालीन पुलावर एका नाल्यावर रेल्वे ट्रॅक आहेत. आता प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता त्यामध्ये आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत. सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने संरचनेच्या मजबुतीकरणाचा समावेश असलेल्या री-गर्डरिंगचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पूर्ण झाला. नुकत्याच झालेल्या ब्लॉक दरम्यान, 10 स्लॅब आणि बॅलास्ट रिटेनर यशस्वीरित्या लाँच करण्यात आले आहे.