मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉकचं (Mega Block) काम हाती घेण्यात आलं आहे. या मेगा ब्लॉक मध्ये रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेह वायरच्या दुरूस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे वर ठाणे-कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप-डाऊन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी- गोरेगाव अप -डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण अप आणि डाऊन फास्ट मार्गावर मेगा ब्लॉक आहे. सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक आहे. यादरम्यान सीएसएमटी स्टेशन मध्ये सकाळी 9.30 ते 2.45 दरम्यान धावणार्या गाड्या ठाणे-कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात आला आहे. कळवा, मुंब्रा, दिवा स्थानकावरही या ट्रेन थांबणार आहे. कल्याण स्थानकातून 10.28ते 3.25 दरम्यान अप जल्लद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
मध्य रेल पर दिनांक 18.06.2023 को मेगा ब्लॉक
ठाणे-कल्याण अप और डाउन फास्ट लाइन सुबह 10.40 बजे से दोपहर 3.40 बजे तक
पनवेल-वाशी अप और डाउन हार्बर लाइन सुबह 11.05 बजे से शाम 4.05 बजे तक
(बेलापुर/नेरूल-खारकोपर सेवाएं प्रभावित नहीं) pic.twitter.com/NxpPlS7A23
— Central Railway (@Central_Railway) June 17, 2023
हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल मधून सीएसएमटी कडे जाणार्या अप हार्बर मार्गावरील लोकल सएवा आणि सीएसएमटी कडून पनवेल/ बेलापूर कडे जाणार्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल कडून ठाण्याला जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि ठाणे कडून पनवेल कडे जाणार्या ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द केली जाणार आहे.
अंधेरी-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. सकाळी 10.35 ते 3.35 दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. राम मंदिर स्थानकात जलद लोकलसाठी फलाट उपलब्ध नसल्याने तेथे लोकल थांबणार नाही. तसेच ब्लॉकदरम्यान काही बोरिवली लोकल गोरेगाव स्थानकांपर्यंतच चालविण्यात येणार आहेत, तर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.