Mumbai Railway Mega Block on 5th January: मुंबईची लाईफलाईन असाणारी मुंबई लोकलाच्या मध्य, हार्बर मार्गावर आज (5 जानेवारी) मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे मुंबईत आज मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणार्या मुंबईकरांना मेगा ब्लॉकचं वेळापत्रक बघूनच बाहेर पडावं लागणार आहे. विद्याविहार ते मुलुंड (Vidyavihar to Mulund) पादचारी पुलाच्या कामासाठी आज मध्य मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. मात्र, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची आज मेगाब्लॉकपासून सुटका झाली आहे. विद्याविहार ते कुर्ला दरम्यान शनिवारी रात्री 12 ते रविवारी पहाटे 5 च्या दरम्यान अप जाणाऱ्या रेल्वे जलद असणार असून डाऊन जाणाऱ्या रेल्वे धीम्या असणार आहेत. विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर उभारण्याकरिता शनिवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून आज सकाळी 5 वाजेपर्यंत या मार्गावर मेगाब्लॉक होता.
चाकरमान्यांची शनिवारी रात्रीपासून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी होणाऱ्या मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे थोडी गैरसोय होण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर उभारण्याकरता रात्री 12 ते पहाटे 5 वाजे पर्यंत ट्राफीक ब्लॉक घेण्यात आला. तर 6 आणि 7 जानेवारीला पश्चिम रेल्वेवर वांद्रे यार्डामध्ये जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेचं नियोजन करूनच घराबाहेर पडणं सोईचं ठरणार आहे. (हेही वाचा - ठाणेकरांसाठी खुशखबर! ठाणे आणि मुलुंडदरम्यान नव्या रेल्वे स्टेशनला मंजुरी; सरकार 14 एकर जागा देणार)
कुठे आणि कधी असेल मेगाब्लॉक?
मध्य रेल्वे - मुलूंड ते माटुंगा दरम्यान 11.30 ते दुपारी 4 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. अप जलद मार्गावर हा मेगाब्लॉक होणार आहे.
हार्बर रेल्वे - सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान 11.40 ते 4.10 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
विक्रोळी पूल कामामुळे विद्याविहार ते कुर्ला दरम्यान शनिवारी रात्री 12 ते आज पहाटे 5 च्या दरम्यान अप जाणाऱ्या रेल्वे जलद असणार आहेत. तर डाऊन जाणाऱ्या रेल्वे धीम्या असणार आहेत.
उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी आज मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर 6, 7 जानेवारीला वांद्रे यार्डमध्ये जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई हे शहर 365 दिवस आणि 24 तास काम करणारं आहे. त्यामुळे आज तुम्हांला मुंबईत प्रवास करायचा असेल तर रेल्वे शिवाय इतर पर्यायी मार्गांचा विचार करावा लागेल. आज ठराविक चालवल्या जाणार्या लोकलमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दीची शक्यता आहे.