Mumabi Local MegaBlock: पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मांटूगा - मुंलूंड आणि पनवेल वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबईतील मध्य, हर्बर, आणि पश्चिम रेल्वेमार्गावर उद्या सकाळपासून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. काही लोकल रद्द करण्यात आले आहेत आणि काही लोकल विलंबाने फेऱ्या घेणार आहे.
मध्य रेल्वे -
स्थानक- माटूंगा ते मुलुंड अप आणि डाउन धीमा
वेळ- स.११.०० ते दु,३.५५
धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.याच पार्श्वभुमीवर लोकल फेऱ्या काही रद्द केला आहेत आणि काही लोकल ह्या २० ते २५ मिनीटे विलंबाने फेऱ्या घेणार आहे.
हार्बर रेल्वे
स्थानक - पनवेल- वाशी अप आणि डाउन धीमा
वेळ - स. ११.०५ ते दु. ४.०५
सीएसएमटीहून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत तसेच ठाणे ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्याची शक्यता आहे. सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान विशेष लोकल फेऱ्या उपलब्ध असतील. बेलापूर ते नेरळ ह्या दरम्यान धावणाऱ्या गाड्या वेळपत्रकानुसार धावणार आहे.
पश्चिम रेल्वे
स्थानक - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल- अप आणि डाऊन धीमा
वेळ - स. १०.३५ ते दुपारी ३.३५
रविवारी ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.काही रेल्वेचे वेळापत्रक बदलणार असल्याचे सांगितले आहे.