Mumbai. (Photo Credit: PTI)

मुंबई (Mumbai) शहारातील अत्यंत दाटीवाटीचा आणि लोकसंख्येची घनता अधिक मोठ्या प्रमाणावर असलेला परिसर म्हणजे धारावी (Dharavi). या परिसरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग वाढला तर तो नियंत्रणात आणायचा कसा? याबाबत सरकार, तज्ज्ञ, महापालिका आणि सर्वसामान्य नागरिकांसमोरही प्रश्न होता. मात्र, धारावी परिसरातील कोरोना संक्रमनावर मर्यादित नियंत्रण मिळविण्यास मुंबई महापालिका (BMC) यशस्वी झाली आहे.

गेल्या प्रदीर्घ काळापासून मुंबईतील धारावी परिसरातील कोरोना व्हायरस संक्रमित प्रतिदिन रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आली आहे. ही रुग्णसंख्या कधी एक अंकी तर कधी दोन अंकी तीसुद्धा 20 च्या आतच आढळत आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार आजही (2 सप्टेंबर 2020) सायंकाळी सहा वाजेपर्यंत धारावी परिसरात 12 नव्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. (हेही वाचा, Coronavirus Death Rate: देशात मृत्युदर अवघा 1.76 टक्के, प्रति 10 लाख नागरिकांंमागे 48 मृत्यु- आरोग्य मंंत्रालय)

धारावी परिसरातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,792 इतकी आहे. त्यातील अनेक रुग्णांना रुग्णालयात उपचार घेतल्यावर बरे वाटू लागल्याने सुटी (डिस्चार्ज) मिळाला आहे. काही रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. दरम्यान, धारावी परिसरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची विद्यमान संख्या ही 95 इतकी आहे. ज्यांच्यावर रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.