मुंबईतील (Mumbai) कामाठीपुरा (Kamathipura) येथील रेड लाइट ऐरिया (Red Light Area) हा वेश्याव्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वेश्याव्यवसाय 90 च्या काळापासून ते आतापर्यंत सुरुच आहे. मात्र आता काही कारणामुळे येथे वेश्या व्यवसायासाठी येणाऱ्या महिला येथील परिसर मजबूरीने सोडून जात आहेत. कारण कामाठीपुरा येथे रियल इस्टेटची वाढती मागणी पाहता येथील वेश्यांना हा परिसर सोडून जाण्यास भाग पडत आहे. एका एनजीओच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, वेश्या व्यवसाय करणाऱ्या या महिला आता मुंबईतील उपनगरीय विभागात राहायला जात आहेत.
एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल अॅक्टिव्हिटीज इंट्रीग्रेश (SAI) एनजीओच्या मुख्याधिकारी विनय यांनी याबद्दल माहिती दिली आहे. कामाठीपुरा आणि फॉल्कलॅंन्ड येथी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची कमाई सर्वात कमी होते. तसेच रियल इस्टेटची वाढती मागणी पाहता याचा परिणाम येथील वेश्या व्यवसायावर होत आहे. त्यामुळे वेश्या कामाठीपुरा सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जागा शोधत आहेत. त्याचसोबत काही वेश्या व्यवसाय बंद सुद्धा झाले आहेत. यापाठी येथील खोलीचे भाडे भरणे अशक्य झाल्याने वेश्या नालासोपारा, तुर्भे आणि वाशी येथे गेल्या आहेत.(पंढरपुर: अल्पवयीन मुलीला दारु पाजून चार नराधमांनी केला बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या)
विनय यांनी पुढे असे ही म्हटले की, कामाठीपुरा येथे काही कमिर्शिअल कंपन्या असल्याने येथे रिअल इस्टेट डेवलपर्सची नजर यावर आहे. आरती नावाच्या एका महिलेनेसुद्धा विनय यांच्या बोलण्याशी सहमती दाखवली आहे. आरती ही ठाणे येथून कामाठीपुरा मध्ये काम करण्यासाठी येते. भाडे वाढ वारंवार होत पण कमाई तिवढी होत नाही. परिवाराचा एवढ्या कमी पैशात सांभाळ करणे मुश्कील होत असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.