प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

जोगेश्वरी येथे मंगळवारी (21 मे) रात्रीच्या वेळेस गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 13 जण जखमी झाले आहेत. तर जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हनुमान चाळ येथे सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये 13 जण जखमी झाल्याचे वृत्त कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या. तसेच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिकासुद्धा तेथे दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर या सर्वांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले.(सावधान! सुनिश्चित वेळेत पाऊस पडला नाही तर मुंबईकरांवर येऊ शकते पाणीकपातीचे भयाण संकट)

मात्र अद्याप स्फोट कशामुळे झाला त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही पोलिसांकडून या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.