Mumbai: ताडदेव येथील इमारतीकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन, अग्निशमन दलाने तयार केली नोटीस
Fire | (Photo Credits: ANI)

Mumbai: मुंबईतील ताडदेव येथील एका रहिवाशी इमारतीकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने अग्निशमन दलाकडून नोटीस धाडण्यासाठी तयारी केली जात आहे. शनिवारी 20 मजली इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले होते. परंतु आग नेमकी कशामुळे आणि कुठे लागली हे अस्पष्टच आहे. परंतु अग्निशमन दलाकडून प्राथमिक तपास सुरु करण्यात आला. मात्र बहुतांश प्रत्यक्षदर्शी हे रुग्णालयात तर काहींची प्रकृती अधिकच गंभीर होती. त्यामुळे आग कशामुळे लागली या संदर्भात त्यांचा जबाब नोंदवता आला नाही.(Mumbai Fire: मुंबईत ताडदेव परिसरात भाटिया हॉस्पिटल जवळील 20 मजली Kamala इमारतीमध्ये आग)

अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी हेमंत परब यांनी असे म्हटले की, आम्ही नोटीस तयार केली असून ती इमारतीला पाठवली जाणार आहे. त्यामध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्यानेआणि अन्य सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे इमारतीने अग्निशमन यंत्रणा ही लवकरात लवकर कार्यकरत करावी असे ही सांगण्यात आले आहे. परंतु इमारतीच्या विरोधात कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.(Mumbai Kamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन, 8 जणांची प्रकृती गंभीर)

आग 19 व्या मजल्यावर लागली आणि एक फ्लॅट, या मजल्याचा कॉमन कॉरिडॉर आणि संपूर्ण डक्टमधील इलेक्ट्रिक केबल्स जळून खाक झाल्या.त्यानंतर अग्शिमन दलाला या घटनेबद्दल फोन येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरु केले. ही आग लागली तेव्हा बहुतांश जण हे झोपेत होती. दरम्यान, मृत्यू झालेल्या 7 पैकी 16 व्या मजल्यावरुन एकाची सुटका करण्यात आली. परंतु तो भाजला गेला आणि त्याला जखमा सुद्धा झाल्या होत्या.