Photo Credit - Pixabay

Mumbai Hoarding Collapsed: मुंबईत घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची (Ghatkopar Hoarding Collapsed) घटना ताजी असतानाच आता मुंबईत मालाड पश्चिम (Malad West) परिसरात होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली. काल बुधवारी (5 जून) रात्री चाचा नेहरू मैदान परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक व्यक्ती गंभीर झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.महेंद्र कुरले असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. ते रात्रीच्या वेळेस होर्डिंगखालून जात असताना ही दुर्घटना घडली. होर्डिंग वजनदार होते, त्यामुळे या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.

विशेष म्हणजे हे होर्डिंगदेखील बेकायदेशीर होते. शंभर बाय दीडशे फूट लांबीचे हे होर्डिंग असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे हे होर्डिंग पालिकेच्या उद्यानातच असल्याचं समोर आलं आहे. बांधकाम व्यावसायिकाने पालिकेची परवानगी न घेता पालिकेच्या उद्यानातच लावले होते.

घाटकोपर दुर्घटना

घाटकोपरमध्ये १३ मे रोजी छेडानगर परिसरात होर्डिंग कोसळलं होतं. या दुर्घटनेत 16 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, तर 60 तासांपेक्षा अधिक काळ तिथे बचावकार्य सुरू होतं. होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवर कारवाई सुरू आहे. तर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर (Hoarding Collapsed Incident) आले होते. शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू होती. अशातच आता पुन्हा एक होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे.