HIV या आजाराबद्दल समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. यामधूनच अनेकांना हीन वागणूक दिली जाते. मात्र मुंबई महानगरपालिका (BMC) आता एचआयव्ही बाधित विधवांना (HIV+ Widows) दरमहा 1 हजार रूपये मासिक पेन्शन देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता एचआयव्ही बाधित विधवांना दर महिन्याला एक हजार रूपयांचं आर्थिक सहाय्य मिळणार आहे. बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय आता जाहीर करण्यात आला आहे. HIV Test लग्नाच्या नोंदणीसाठी बंधनकारक? गोवा सरकार नवा नियम अंमलात आणण्याच्या विचारात
पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय आहेत नियम?
- मुंबईमध्ये राहणार्या आणि HIV ग्रस्त पतीच्या निधनानंतर स्त्रीला पेंशन मिळेल.
- पतीचा मृत्यू एड्समुळे झाला असेल तर त्याच्या नावाची नोंदणी SRT केंद्रामध्ये असावी.
- पतीचा मृत्यूचा दाखला / पालिकेच्या शासकीय मृत्यू नोंदवहीमधील उतारा सादर करणं आवश्यक
- पेन्शन फक्त स्त्रीला मिळेल, तिच्या वारसदारांना या पेन्शनचा लाभ मिळणार नाही.
- विधवेच्या मृत्यूनंतर पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही
- लाभार्थी विधवा देखील एचआयव्ही संक्रमित आणि नियमित एसआरटी औषधोपचार घेणारी असावी, असा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.
महिलांना पालिकेकडून मिळणारे आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बॅंक अकाऊंटमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे 2 ते 3500 विधवा महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. पालिकेने या नव्या पेंन्शन योजनेसाठी काही नियम देखील जाहीर केले आहेत.