सध्या कोणत्याही समस्येची हवाई पाहाणी करण्याची फॅशन आल्याची टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) केली. गेली 13 वर्ष मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) चौपदीकरणाचं काम रखडलेलंच आहे. खाचखळग्यांनी भरलेला हा रस्ता सध्या वाहनचालकांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरतो आहे. पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम 31 मेपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यावर मुंबई-गोवा डेडलाईन पाळली जाते का बघू, असे उच्च न्यायालयाने केली आहे.
या महामार्गाच्या कामाची हवाई पाहणी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. मात्र अद्यापही या कामाची ठरवलेली डेडलाईन पूर्ण झालेली नाही, तसेच या संपूर्ण महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याबाबत राज्य सरकारनं मनात आणलं तर हे काही दिवसांत होऊ शकतं असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं आहे.
पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम कंपनीला साहित्याचा तुटवडा भासल्याने लांबल्याची माहिती कंत्राटदाराने दिली. या महामार्गाचे रखडलेले काम आणि वाढते अपघात याबाबत वकील ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उत्तर देताना च्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गाचा पहिला टप्पा 31 मेपर्यंत सुरु होण्यीची शक्यता आहे.