Mumbai High Court | (File Photo)

मुंबईत राहणाऱ्या एका व्यावसायिकाने खागजी क्लिकमधील डॉक्टरांच्या मदतीने हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करुन घेतली. मात्र ही सर्जरी केल्यानंतर त्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सदर व्यक्तीच्या पत्तीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच हेअर ट्रान्सप्लांट केलेल्या डॉक्टरांना आरोपी ठरवले असून त्यांच्या विरोधात पुरावे जमा करुन गुन्हा दाखल करावा अषी मागणी महिलेने केली आहे.

श्रवण कुमार चौधरी असे व्यकीचे नाव असून त्यांनी डॉ. विकास हवाई यांच्या क्लिनिकमधून हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला होता. तर मार्च महिन्यात चौधरी यांच्यावर हेअर ट्रान्सप्लांटची सर्जरी करण्यात आली. मात्र सर्जरीनंतर त्यांच्या डोक्याला गंभीर वेदना होत असल्याने चौधरी यांना दळवी नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर चौधरी यांना बरे सुद्धा वाटले. मात्र पुन्हा डोक्यात वेदना सुरु झाल्याने त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आला. परंतु उपचारदरम्यान चौधरी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.(मुंबई: अल्पवयीन मुलीच्या गालाचा चावा घेणे पडले महागात, 21 वर्षीय तरुणाला 11 महिन्यांचा तुरुंगवास)

या प्रकारामुळे चौधरी यांच्या पत्नीने आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चौधरी यांच्या मृत्यू प्रकरणी आता जे.जे. रुग्णालयाकडून ही चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचसोबत महिलेकडे डॉक्टरांच्या विरोधात असलेले पुरावे पोलिसांकडे सुद्धा सोपवण्यात आले असून गुन्हा दाखल करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर महिलेच्या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि एन.जे. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.