
महाराष्ट्रात बोकाळलेली गुन्हेगारी केवळ प्रौढांमध्येच नव्हे तर ती आता अल्पवयीनांमध्येही पोहोचली आहे. वसई-विरार महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या नालासोपारा (Nala Sopara) येथील एक घटना आणि मुंबई येथील घाटकोपर (Ghatkopar) परिसरात घडलेल्या इतर दोन घटनांनी लहना मुलांमधील गुन्हेगारीवर अधिक प्रकाश टाकला आहे. पहिल्या घटनेत नालासोपारा येथील अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने अवघ्या पाच वर्षांच्या मामेबहीणीची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे केवळ इतर सर्वजण तिचा लाड करतात येवढ्याच कारणावरुन मनात उत्पन्न झालेल्या रागातून त्याने हे कृत्य केले आहे. ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दुसऱ्या दोन घटनांमध्ये एका चुमुकल्याची पाळण्यातच हत्या झाली आहे. तर, इतर एका घटनेत बहिणीची छेड का काढली? असे विचारल्यावरुन एकाची हत्या करण्यात आली आहे.
'सर्वजन तिताच लाड करतात म्हणून हत्या'
नालासोपारा येथे घडलेल्या घटनेत एक पाच वर्षांची चिमुकली अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. अखेर रविवारी पहाटे चारच्या सुमारास या चिमुकलीचा मृतदेह जंगलात सापडला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या तपासामुळे घटनेचा उलघडा झाला. तिची हत्या तिच्याच मामेभावाने केली असल्याचे उघडकीस आले. जो केवळ 13 वर्षांचा आहे. धक्कादायक म्हणजे, घरातील सर्वजण तिचाच लाड करतात. माझा कोणीच लाड करत नाहीत, असा राग मनात धरुन त्याने हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीने आतेबहणीचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून ही हत्या केली. अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारताच हत्या
मुंबईतील गोवंडी परिसरातील एका घटनेत 13 वर्षीय मुलाची मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी पीडित मुलाच्या बहिणीची कथीतरित्या छेड काढली होती. त्यामुळे आपल्या बहिणीची छेड का काढली? असा जाब पीडिताने आरोपींना विचारला असता आरोपींकडून त्यास बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सैफ अल बद्रुद्दीन सावंत नामक तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. तो 23 वर्षांचा असून व्यवसायाने हमाल आहे. आरोपी घाटकोपर मानखुर्द जोडरस्त्यावरील झाकीर हुसेननगर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चार महिन्याच्या मुलीचा पाळण्यात आवळला गळा
तिसरे अपत्य टाळण्यासाठी जन्मास आलेल्या बाळाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घाटकोपर येथील पंतनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी 40 वर्षीय इसमास पोलिसांनी अटक केली आहे. हा इसम मृत बाळाचा वडील आहे. त्यास आगोदर दोन आपत्ये आहेत आणि आता तिसरे अपत्य नको म्हणूनच त्याने पाळण्यात असलेल्या बाळाची गळा आवळून हत्या केली आहे. संजय बाबू कोकरे असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी शैला संजय कोकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.