Mumbai FYJC Admissions 2020: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रवेशपूर्व प्रक्रिया यंदा केवळ ऑनलाईन माध्यामातून; महाविद्यालयांचे ट्रेनिंग सुरू
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash.com)

महाराष्ट्र शिक्षण विभागाने एफवायजेसी (FYJC) म्हणजेच 11 वी इयत्तेसाठी प्रवेशपूर्व प्रक्रिया आजपासून सुरु केली आहे. कोविड19 आणि लॉकडाऊनमुळे प्रवेशपूर्व आणि प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.शिक्षण विभागाने ज्युनिअर महाविद्यालयांसाठी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून काही प्रक्षिणाचे वर्ग घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्युनिअर महाविद्यालयांना काही गोष्टींमध्ये बदल आणि विषयांबबात अधिक माहिती https://mumbai.11thadmission.org.in. येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ज्या महाविद्यालयांनी गेल्या वर्षात रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना एक मेसेज येणार आहे. त्यामध्ये युजर्सनेम आणि पासवर्ड दिला जाणार असून संकेस्थळावर लॉगिन करता येणार आहे. तसेच काही बदल सुद्धा तेथे करता येणार असल्याचे सोमवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.(IIT-Bombay चे डिसेंबर 2020 पर्यंतचे वर्ग ऑनलाईन होणार; COVID 19 च्या पार्श्वभूमीवर निर्णय) 

महाराष्ट्र राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी उच्च माध्यमिक शाळांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला  सुरुवात झाली आहे.

महाविद्यालयांना लॉगिन संबंधित अधिक माहिती देण्यात येणार आहे. याचा वापर करुन महाविद्यालयांना त्यांच्याकडे किती जागा, शाखा आणि प्रवेश संबंधित अधिक माहिती पोर्टलवर पाहता येणार आहे. दरम्यान, एसएसी (SSC) परीक्षेचा निकाल जुलै महिन्याचा अखेर पर्यंत आणि एफवायएससी (FYSC) साठी ऑगस्ट महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.