![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/04/College-studentsPTI-784x441-380x214.jpg)
आज (5 जुलै) अकरावी (FYJC) प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. तर विद्यार्थी आणि पालकांना 6 जुलै व 7 जुलैला सकाळी 11 ते 5 या वेळात गुणवत्ता यादीमधील काही त्रुटी किंवा हरकतींबद्दल आपले मत उपसंचालक कार्यालयात नोंदवू शकणार आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच मराठा आरक्षणाबद्दल निर्यण जाहीर केला आहे. त्यानुसार मराठा समाजाला शिक्षणासाठी 12 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. तसेच मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासाठी 4 जुलैपर्यंत कालावधी देण्यात आला होता. त्याचसोबत मुंबईतून 1 लाख 85 हजार 477 अर्ज दाखल झाले आहेत. मात्र एकूण विद्यार्थ्यांमधून 92 हजार 220 मुली आणि 93 हजार 257 मुलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
तर 12 जुलै रोजी अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्याच दिवशी उपसंचालक कार्यालयाकडून उपलब्ध जागांसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष या सर्वसाधारण गुणवत्ता यादीकडे लागले आहे.