आज, शनिवार, 23 मे रोजी सुपारी 4 वाजताच्या सुमारास भांडुप (Bhandup) व नाहूर (Nahur) यांच्या दरम्यान येणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गाच्या (Eastern Express Way) जवळील खुल्या मैदानातील गवताने अचानक पेट (Fire) घेतला आणि परिसरात धुराचे लोट पसरू लागले. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. याबाबत परिसरातील स्थानिकांनी त्वरित अग्निशमन दलाला माहिती दिल्याने आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे, अद्यापही आग पूर्णपणे विझलेली नसून या भागात अग्निशमन दल कार्यरत आहे. प्राप्त माहितीनुसार, संबंधित आगीची घटना ही लोक प्रिया पार्क (Lok Priya Park) या परिसरात घडल्याचे समजत आहे.
मुंबई मिरर च्या माहितीनुसार, याठिकाणी अग्निशमन दलाचे तब्बल 7 गाड्या आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आल्या होत्या. हा भाग रहिवाशी इमारती आणि पूर्व द्रुतगती मार्गाच्या जवळ असल्याने अनेकांनी या परिसरात पसरलेल्या धुराचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.
पहा व्हिडीओ
Fire at Eastern expressway Mumbai near Magroves. Thick smoke.
Nahur east#mulund
— मुंबई Matters™✳️ (@mumbaimatterz) May 23, 2020
दरम्यान, या घटनेत आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. गवतात आग लागताच हवेमुळे पटकन ही आग पसरलीमी सुदैवाने त्यावेळेस या ठिकाणी कोणीही नसल्याने जीवित हानी झालेली नाही. ठाणे आणि मुलुंड भागात सुद्धा धुराचे लोट दिसून आले होते.