मुंबईतील शिवडी (Sewri) भागात स्थित प्रसिद्ध लक्ष्मी विलास हॉटेलच्या (Lakshmi Vilas Hotel) गोदामाला आज , 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याचे समजत आहे. या भागातून सकाळी 11 च्या सुमारास धुराचे लोट उसळताना दिसून आले, आणि त्यानंंतर अग्निशमन दलाला याठिकाणी पाचारण करण्यात आले. सध्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र गोदामातील विद्युत उपकरणाच्या वायरिंग मध्ये शॉटसर्किट होऊन ही आग लागल्याचा अंदाज आहे.
प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मी विलास हॉटेलच्या गोदामाला लागलेली आग ही लेव्हल 3 ची होती तसेच या आगीमुळे उसळणारे धुराचे लोट इतके भीषण होते इ त्यावरून आगीच्या तीव्रतेचा अंदाज लावता येईल. सकाळच्या वेळेस ही आग लागल्यावर अद्याप आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या गोदामात हॉटेलचे सामान असल्याने नुकसान झाल्याची शक्यता आहे, मात्र जीवितहानी झाली नाही ही त्यातील समाधानाची बाब म्हणता येईल.
PTI ट्विट
Fire breaks out in godown in Sewri in Mumbai: Officials
— Press Trust of India (@PTI_News) March 16, 2020
दरम्यान, मुंबईत दर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडत आहेत. नुकतेच 9 मार्च रोजी भायखळा येथील धोबी घाट परिसरात असलेल्या सेक्रेटा स्कूल नजीक असलेल्या झोपडपट्टी जवळ सुद्धा आग लागली होती. त्याआधीच जोगेश्वरी परिसरात सुद्धा कापडाच्या गोदामाला आग लागली होती.