Mumbai Fire (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) मधील जोगेश्वरी (Jogeshwari) भागातील एका गोदामाला आज, गुरुवारी, 5 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग (Mumbai Fire) लागल्याचे समजत आहे, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले, काही तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेरीस आता या आगीला आटोक्यात आणण्यात यश आले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र या आगीमागील कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्राप्त माहितीनुसार, अग्निशमन दलाला आता ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. मात्र अशा प्रकारच्या घटनेमुळे सकाळपासूनच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे, तसेच धुराचे लोट अद्यापही कमी झालेले दिसत नाहीत. या घटनेचे काही फोटो ANI वृत्तसंस्थेने शेअर केले आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, मागील काही काळात मुंबई मध्ये आगीच्या घटनांचे प्रमाण वाढतच आहे, काही दिवसांपूर्वी अंधेरी येथील रॉल्टा कंपनीला लागलेली आग, त्याच्या पाठोपाठ लगेचच मुंबईतील जीएसटी भवनाला लागलेली आग त्यासोबतच ठाणे, कल्याण, डोंबिवली, या भागातही अनेक आगीच्या घटना मागील महिन्यभरात समोर आल्या होत्या. या घटना आटोक्यात आणून जीवित हानी जरी होत नसली तरी त्यात वास्तू आणि मालमत्तेचे बरेच नुकसान होते, त्यामुळेच आगीसंबंधी पूर्व दक्षता घेणे आवश्यक आहे.