Mumbai Fire: कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळ स्कायवॉकला आग; अग्निशमन दलाच्या 2 गाड्या रवाना
Cotton Green Railway Station Skywalk Fire (Photo Credits: Twitter/ ANI)

मुंबईमध्ये हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळ (Cotton Green Railway Station) असलेल्या स्कायवॉकला आग लागली आहे. आज (14 सप्टेंबर) दिवशी सकाळी अचानक स्कायवॉकजवळ आग लागल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या ही आग विझवण्यासाठी 2 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. आग नेमकी कशामुळे लागली आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार सकाळी आग लागली, बघता बघता या आगीचे रूप वाढत गेले आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. मात्र नेमके कारण तसेच आगीत नेमके किती नुकसान झाले आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान आज मुंबई मेट्रो लाईन 3 च्या भोगद्याजवळ काम करताना मोठा दगड कोसळून एका कामगाराचा मृत्यू, एकजण जखमी आहे.

ANI Tweet 

रेल्वे प्रशासनाला आगीचं वृत्त समजताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाची मदत घेतली. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे.