मुंबई: तबलीगी जमातीच्या 150 जणांविरोधात Quarantine च्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस स्थानकात FIR दाखल
Mumbai Police | (File Photo)

दिल्लीच्या मकरज कार्यक्रमामध्ये सहभागी 150 तबलिगी समाजाच्या लोकांविरोधात मुंबईच्या आझाद मैदान पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतामध्ये कोरोनाचं संकट टाळण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच परदेशी प्रवास केलेल्यांना किंवा कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना आरोग्य प्रशासनाकडून क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तबलिगी जमातीच्या 150 जणांनी हे नियम धुडकावून लावल्याने मुंबई महानगर पालिकेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आता या तबलिगींविरोधात कारवाई करताना क्वारंटाईनचे आदेश धुडकावणार्‍यांविरोधात कलम 271, 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच कलम 269 देखील लावण्यात आले आहे.

भारतामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना नागरिकांनी सामाजिक,धार्मिक कार्यक्रम टाळावेत असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र तरीदेखील मुस्लिम धर्मातील तबलिगी समाजातील काही लोकांनी दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मकरजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग केला. परदेशी नागरिकांसोबत सुमारे 2-3 हजार जण एकत्र राहिले. पुढे ते देशभर विखुरले गेले. यामुळे भारतामध्ये कोरोना झपाट्याने पसरला गेल्याचाही दावा करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकारणानंतरही तबलिगी समाजातील काही लोकांनी डॉक्टर, नर्स यांच्यासोबत वाईट वर्तन केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 4421 वर पोहचला आहे. त्यापैकी सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत.

Bronx Zoo Nadia वाघिणीला कोरोना झाल्यानंतर अनेक ठिकाणी प्राणी संग्रहालयात सतर्कता पाळण्याचे आदेश : Watch Video 

धारावीमध्ये 1 एप्रिलला सापडलेल्या पहिल्या रूग्णाच्या घरीदेखील या मकरज कार्यक्रमात सहभागी 10 जण रहायला होते अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर ते 10 जण केरळला गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. सध्या मुंबई राज्यात कोरोनाबधितांचा आकडा 891 पर्यंत पोहचला आहे.