Mumbai: मुंबईतील धारावीत पोलिसांकडून कोविड19 चे बनावट सर्टिफिकेट तयार करुन विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. फ्रांसिस नाडर (36 वर्ष) असे आरोपीचे नाव असून तो धारावी परिसरात एक सायबर कॅफे चालवतो.(Maharashtra COVID-19 Guidelines: राज्यात उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू, जाणुन घ्या नियम)
धारावी पोलिसांना याबद्दल टीप मिळाली होती की, सायबर कॅफे चालवणारा फ्रांसिस नाडर हा कोविड19 चे बनवाट सर्टिफिकेट तयार करुन विर्की करतो. त्यानंतर पोलिसांनी छापा मारत नाडर याला अटक केली. चौकशीत असे समोर आले की, तो हे काम पैशांसाठी करत होता. अशा पद्धतीने त्याने आतापर्यंत 4 लोकांना बनावट सर्टिफिकेट तयार करुन विक्री केले आहे.
पोलिसांनी आवाहन केले आहे की, बनावट सर्टिफिकेटला बळी पडू नका. उलट नागरिकांनी स्वत: पूर्णपणे लसीकरण करुन घेत त्याचे सर्टिफिकेट प्राप्त करा. तर मुंबईत जसजशी कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढत आहे त्यानुसार सरकारकडून निर्बंध आता कठोर केले जात आहेत.(Corona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 93 पोलिसांना कोरोनाची लागण, आतापर्यंत 9657 पोलिस संक्रमित)
दरम्यान, विविध ठिकाणी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच परवानगी दिली जात आहे. मात्र ज्या लोकांचे अद्याप लस घेतलेली नाही ते अशा पद्धतीने बनावट सर्टिफिकेट तयार करुन घेतानाचे प्रकार समोर येत आहेत.