मुंबई मधील पूर्व उपनगरीय भागात बहुतांश ठिकाणी गॅस गळतीची तक्रार, अग्निशमन दलाकडून तपास सुरु- रिपोर्ट
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

मुंबईतील पूर्व उपनगरीय (Eastern Suburbs Mumbai) भागात बहुतांश ठिकाणी गॅस गळती होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. याबाबत अग्निशमन दलाला कळवण्यात आले असून त्याबाबत अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच मुंबई नागरी संस्था यांनी राष्ट्रीय केमिकल फर्टिलाझर्स चेंबूर येथून गॅस गळती होत असल्याचे माहिती दिली आहे. त्याचसोबत अन्य ऐजेंसींना सुद्धा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

या प्रकरणी महानगर गॅस लिमिटेड यांनी असे म्हटले आहे की, महानगर गॅसच्या पाईपलाईन संदर्भात नाही आहे. परंतु आमची आपत्कालीन टीम याबाबत अधिक माहित मिळवत असून त्याबाबत अधिक वृत्त लवकरच दिले जाईल असे सांगण्यात आले आहे. तसेच मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून लोक अग्निशमन विभागाकडे संपर्क करत आहेत.

Tweet:

तसेच मुंबई महानगरपालिका आपत्ती टीम यांनी आम्ही महानगर गॅस लिमिटेड यांच्यासोबत सातत्याने संपर्कात आहोत. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून सुद्धा गॅस गळती प्रकरणी कोणती माहिती मिळते आहे का याबाबत वाट पाहत आहोत. मात्र अन्य कंपन्यांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.