Arrested (Photo Credits: Facebook)

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अँटी-नॉरकोटीक्स सेलने (Anti-narcotics Cell) 2.25 कोटींचे ड्रग्स जप्त केले आहेत. शहरातील चार ठिकाणी छापे टाकून मेफेड्रोन (Mephedrone), कोकेन (Cocaine) आणि गांजा (Ganja) हे अंमली पदार्थ जप्त करुन याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. एएनसीच्या वांद्रे युनिटने (ANC Bandra Unit) अंधेरी (Andheri) येथे बुधवारी छापा टाकला आणि 1.02 कोटींचे 510 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. या छाप्यामध्ये दक्षिण मुंबईमधील डोंगरी भागात राहणाऱ्या ड्रग वितरक अन्वर इक्बाल सय्यद या 41 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले.

मुंबई उपनगर आणि नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग  विक्री करण्यामागे या सय्यदचा मोठा हात होता. या ऑपरेशनसाठी घाटकोपर युनिटच्या एएनसी टीमने दक्षिण मुंबईमधील मशिद बंदर येथे सापळा रचला. त्यानंतर एकूण 545 ग्रॅम मेफेड्रोन बाळगणाऱ्या 3 व्यक्तींना अटक केली. या ऑपरेशनमध्ये ताब्यात घेतलेल्या ड्रग्सची किंमत 41.75 लाख इतकी आहे. (Mumbai: ड्रग्ज वापरुन केक तयार करणाऱ्या 25 वर्षीय डॉक्टरचा NCB कडून पर्दाफाश, आरोपीला अटक)

एएनसीच्या आझाद मैदान युनिटने देखील बुधवारी दुपारी वाडी बंदर येथे 39.06 लाख किंमतीचे कोकेन बाळगणाऱ्या एका 29 वर्षीय नायझेरियन व्यक्तीला अटक केली आहे. तर वरळी युनिटने 2.40 लाख रुपयांचा गांजा बाळगणाऱ्या 2 व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, एनसीबीने 183.4 ग्रॅमचे मेफेड्रोन आणि 18 लाख रुपये जप्त करत 3 जणांना गुरुवारी अटक केली. यामध्ये जोगेश्वरी पूर्वेतील अमिना नगर चाळीतील अरबार खान या व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडे 80 ग्रॅम मेफेड्रोन सापडले. त्याचबरोबर 18 लाख रुपयांची रोख रक्कमही सापडली. तर दुसऱ्या छाप्यात अंधेरी पूर्वेकडील थ्री-स्टार हॉटेलमधून ड्रग्सचा व्यापार करणाऱ्या टोळीला अटक केली. यांच्याकडे 103.4 ग्रॅम मेफेड्रोन सापडले.