देशभरासह मुंबईत (Mumbai) सुद्धा कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच कारणास्तव रुग्णवाढीचा दर सुद्धा कमी झाला आहे. याच दरम्यान मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) मात्र कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. तर आज धारावीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2711 वर पोहचल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
धारावीत सध्या 84 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 2367 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकार कडून कोविड आणि क्वारंटाइन सेंटर्सची उभारणी करण्यात आली आहे. तसेच डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. ऐवढेच नव्हे तर कोविड योद्धे सुद्धा कोरोनाच्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावताना दिसून येत आहेत.(ठाणे येथे कोरोनाचे आणखी 1284 रुग्ण आढळले तर 26 जणांचा बळी, COVID19 चा आकडा 1,13,884 वर पोहचला)
6 new #COVID19 cases reported in Dharavi area of Mumbai today. With this, total number of cases rises to 2,711 including 2,367 discharges and 84 active cases: Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Maharashtra pic.twitter.com/Xx2GlZHRiW
— ANI (@ANI) August 23, 2020
दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल (22 ऑगस्ट) राज्यात 14,492 नवे रुग्ण आढळले असून 297 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 61 हजार 942 इतकी झाली आहे. आतापर्यंत 4,80,114 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय सध्या राज्यात 1 लाख 69 हजार 516 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.