कोविड19 विषाणूच्या जनुकीय सुत्रांचे निर्धारण करणारी वैद्यकिय संस्था बृहन्मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) कार्यान्वित झाल्यानंतर करण्यात आलेल्या पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार कोविड (COVID19) चाचणीच्या एकूण 188 नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ चे (Delta Plus) 128 रुग्ण आढळल्याचे महापालिकेने म्हटले आहे. उर्वरित नमून्यांमध्ये अल्फा 2, केपा 24, तर इतर सर्वसाधारण प्रकाराचे विषाणू आढळल्याचे निदर्शनास आले आहे.(महाराष्ट्रातील आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे नागरिकांना आवाहन)
डेल्टा विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचे नागरिकांनी कठोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, हाताची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात असे महापालिकेने म्हटले आहे. (Covid-19 Update in Pune: पुणे शहरात आज 2077 नवे कोरोना रुग्ण; 6 जणांचा मृत्यू)
Tweet:
कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत मुंबईतील पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर.
कोविड चाचणीच्या एकूण १८८ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ चे १२८ रुग्ण.
अल्फा २, केपा २४, तर इतर सर्वसाधारण प्रकाराचे विषाणू.
कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचे नागरिकांनी कठोर पालन करावेः आवाहन. pic.twitter.com/q2HFrR7ywB
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 23, 2021
कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोरोनाचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकिय नमून्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य झाले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 4 ऑगस्ट 2021 रोजी नेक्स जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग लॅबचे लोकापर्ण करण्यात आले होते.